Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सभा सुरू असताना अचानक नितीन गडकरी यांना चक्कर आली अन…!

0 692

कोलकाता: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक तब्येत बिघडली आहे. कोलकाता येथील एका सभेला संबोधित करताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. परिवहन आणि राष्ट्रीय राजमार्गाच्या कार्यक्रमालाच्या कार्यक्रमासाठी ते सिलीगुडीला आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे भूमिपूजन करण्यात आले. 1206 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सिलीगुडी येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नितीन गडकरी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी भाषणाला सुरूवातही केली. भाषण सुरू असतानाच अचानक त्यांना गरगरल्या सारखं झालं. त्यामुळे त्यांनी तात्काळ भाषण थांबवलं आणि खुर्चीवर जाऊन बसले. त्यांची तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्याने स्टेजवरील नेत्यांनी त्यांना प्यायला पाणी दिलं.

 

दरम्यान, नितीन गडकरी यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.