मुंबई : प्रेयसीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बापू नारायण मोकाशी (वय 43 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे.
माहितीनुसार, प्रेयसीवर अत्याचार झाला. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अनेक तक्रार करुनही न्याय मिळाला नाही. म्हणून तरुणाने मंत्रालयात येत पाचव्या माळ्यावरून उडी घेतली. याआधी चार वेळा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असे तरुणांचे म्हणणे आहे.
दरम्यान,
मंत्रालयात हा प्रकार घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. मंत्रालयाला लावलेल्या संरक्षण जाळ्यांमुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.