मुंबई: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी, सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशातच युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नाही. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. त्यांचे कर्ज माफ होत नाही, संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नसल्याचे गांधी म्हणाले. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, माझ्या वक्तव्यावरुन जर कोण यात्रा रोखणार असेल, तर त्यांनी रोखावी यात्रा असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी यावेळी केले आहे. सरकारला जर वाटलं ही भारत जोडो यात्रा रोखली पाहिजे, तर त्यांनी यात्रा रोखावी असेही गांधी म्हणाले. आम्हाला भारत जोडायचा आहे. आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली आहे. आता आम्हाला श्रीनगरपर्यंत जायचे असल्याचं गांधी म्हणाले.