मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक झाली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे भाजप, शिंदे गट आणि आता मनसे राहुल गांधींविरोधात मैदानात उतरली आहे.
दरम्यान, आता राहुल गांधींना मनसे कार्यकर्ते कुठे काळे झेंडे दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.