मुंबई: भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नसल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले. अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, “सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिलं नाही. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत, शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही, जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच, देशात युवकांना रोजगार मिळत नाही. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही त्यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, पैशांचं आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत आहे, 50 कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले जात असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.