Latest Marathi News

BREAKING NEWS

“…. मग भारतरत्न सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना का नाही दिला?”: संजय राऊत!

0 167

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. मग वीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न का देत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

 

Jawale Jewellers

संजय राऊत म्हणाले, “वीर सावरकरांनंतर एकमेव हिंदुरुदयसम्राट ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे आम्हाला रोज सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आम्ही गेल्या 15 वर्षांपासून मागणी करत आहोत. पण अजून दिला नाही. त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? इतकंच कशाला तुम्हाला एवढंच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेब ठाकरे यांनाही पुरस्कार द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. हे आपल्याला माहीत असेल. पण बाळासाहेबांसारखा आणि वीर सावरकर सारख्या महान लोकांचा भारतरत्न किताबाने का सन्मान केला नाही? असा सवाल त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.