Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी : केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्यातील बेकायदा बांधकामावर अखेर हातोडा

0 320

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्यास अखेर सुरुवात झाली आहे. कोर्टाने अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यानंतर राणे कुटुंबाकडूनच हातोडा चालवला जात आहे. न्यायालयाने राणेंना ‘अधीश’ मधील बांधकाम स्वत:हून हटवावे अथवा मुंबई महानगरपालिकेने पाडकाम केल्यास त्याचे पैसे वसूल करण्याचा इशारा नोटीसमध्ये दिला होता.

Jawale Jewellers

नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या आठ मजली ‘अधीश’ बंगल्यात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल केल्याची, अतिरिक्त बांधकाम केल्याची, तसंच सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी २१ फेब्रुवारी रोजी ‘अधीश’ बंगल्याची पाहणी केली होती.

Manganga

मुंबई महापालिकेने ‘अधीश’ बंगल्यात बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचं निदर्शनास आणल्यानंतर नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने हे बांधकाम अनधिकृत ठरवून त्यावर दोन आठवड्यांत कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होतं. इतकंच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेकडे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी दुसऱ्यांदा केलेला राणे यांचा अर्ज न्यायालयाने चुकीचा ठरविला आणि १० लाख रुपये दंड ठोठावला.

Leave A Reply

Your email address will not be published.