Latest Marathi News

BREAKING NEWS

गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही पर्याय ठेवणे अनिवार्य!

0 171

मुंबई: गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (ट्रान्सजेंडर) पर्याय ठेवणे अनिवार्य असेल, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई खंडपीठाच्या अध्यक्ष मृदुला भाटकर यांनी दिले आहेत.

 

Jawale Jewellers

मॅटच्या आदेशानुसार गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही पर्याय ठेवावा लागणार आहे. तसेच भरती प्रक्रियेतील तृतीयपंथीयांच्या श्रेणीसाठी शारीरिक चाचणीचे निकषही निश्चित करण्याचेही न्यायाधिकरणाने गृह विभागाला सांगितले आहे.

Manganga

 

दरम्यान, पोलीस हवालदार पदाचा ऑनलाईन अर्ज भरताना अर्जात पुरुष आणि स्त्री असे दोनच पर्याय उपलब्ध होते. अर्जदार हा तृतीयपंथीय असल्याने तो दोन्हीपैकी कोणत्याच पर्यायाची निवड करू न शकल्याने त्याचा अर्ज स्वीकारला गेला नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध नसल्याविरोधात तक्रारदाराने मॅटकडे याचिका दाखल केली.भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही पर्याय उपलब्ध करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर तृतीयपंथी अर्जदाराची मागणी मान्य झाली. त्यामुळे गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (ट्रान्सजेंडर) पर्याय ठेवणे अनिवार्य असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.