Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, गुरुवार १७ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 663

मेष:-
दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. मोठा प्रवास करता येईल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या. अचानक घडामोडी घडतील. कामाचे व्यवस्थापन करण्यात दिवस निघून जाईल.

 

Jawale Jewellers

वृषभ:-
हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. हितशत्रू पराभूत होतील. मनाची चंचलता जाणवेल.

Manganga

 

मिथुन:-
मित्रांशी झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल. कामात काही बदल घडून येतील. दिवस संमिश्रतेत जाईल. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल. धावपळ करावी लागेल.

 

कर्क:-
व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत. लहान प्रवास घडेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. घरगुती कामात व्यस्त राहाल. घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल.

 

सिंह:-
बोलण्यातील गोडवा कायम ठेवा. अडकलेल्या कामांना जोर लावावा. हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा. नशीबाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला सहकार्‍याकडून मदत मिळेल.

 

कन्या:-
कामाची विचारपूर्वक अंमल बजावणी कराल. घरातील गोष्टी मनाप्रमाणे घडतील. हातात काही अधिकार येतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

 

तूळ:-
मिळकतीची नवीन स्त्रोत सापडतील. क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. आनंदाची अनुभूती घ्याल.गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल.

 

वृश्चिक:-
कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. नियोजन बद्ध कामे करा. कामकाज सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या. मुलांची स्वतंत्र मते जाणून घ्या. क्रोध वृत्तीला आवर घाला.

 

धनू:-
कामात स्त्रियांची मदत लाभेल. नातेवाईकांना मदत कराल. तरुण लोकांशी मैत्री होईल. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा. स्वत:च्या हिंमतीवर कामे हाती घ्याल.

 

मकर:-
आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. महत्त्वाचे निर्णय हाती लागू शकतात. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. कमिशन मधून लाभ कमवा. दिनक्रम व्यस्त राहील.

 

कुंभ:-
जवळचा प्रवास चांगला होईल. मनाविरुद्ध गोष्टी करू नका. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान मिळेल. संभ्रमीत अवस्थेत निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

 

मीन:-
डोकेदुखीचा त्रास संभवतो. विचार सतत बदलू नका. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. तडकाफडकी गोष्टी करू नका. कुटुंबासमवेत वेळ घालवा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.