Latest Marathi News

BREAKING NEWS

…..म्हणून संजय राऊत यांच्या अडचणीत होणार मोठी वाढ!

0 471

मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच जेलमधून सुटका झालीय. राऊतांनी जेलमधून सुटून अवघे काही दिवस झाले असताना ईडीकडून संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करणारी सुधारीत याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ईडीच्या सुधारित याचिकेवर येत्या 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, ईडीने गेल्यावेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकेत कोर्टाकडून काही चुका सांगण्यात आल्या होत्या. त्या सर्व चुका दुरुस्त करुन ईडीकडून आता मुंबई हायकोर्टात सुधारित याचिका दाखल करण्यात आली.

Manganga

 

दरम्यान, ईडीकडून आज मुंबई हायकोर्टात संजय राऊतांच्या याचिकेला विरोध करणारी सुधारीत याचिका दाखल करण्यात आली . या याचिकेवर येत्या 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.