Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रद्धा वालकर हत्याकांड: पोलिसांना जंगलात सापडले १० अवयव अन….!

0 399

दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महत्वाची माहिती हाती आली आहे. दिल्ली पोलिसांना महरौलीच्या जंगलात हाडे सापडली आहेत. त्यात मणक्याचीही हाडे आहेत. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणांहून आतापर्यंत शरीराचे १० अवयव पोलिसांना आढळून आले आहेत.

 

Jawale Jewellers

श्रद्धा वालकरची तिच्याच बॉयफ्रेंडनं हत्या केली. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची माहिती समोर आली. दिल्ली पोलिसांनी तपास करताना महरौलीच्या जंगलात शोध घेतला असता पाठीचा कणा सापडला आहे. याशिवाय शरीराचे दहा अवयव पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी फ्लॅटचीही झडती घेतली आहे. फ्लॅटमधील किचनमध्ये रक्ताचे डागही आढळून आले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यावरून ते रक्त नेमके कुणाचे आहे, याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

Manganga

 

दरम्यान, दिल्लीच्या साकेत कोर्टानं श्रद्धा प्रकरणातील आरोपी आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी नार्को टेस्टची परवानगी मागितली होती. आफताब हा पोलीस चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता, असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.