Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी: राज्य सरकार देणार १ लाख तरुणांना रोजगार!

0 243

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखांहून अधिक रोजगारासाठी सरकारकडून सामंज्यस करार करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग पुढाकार घेणार आहे. यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातून प्रकल्प बाहेर गेल्यानंतर मोठा करार मानला जात आहे. विरोधकांना शिंदे-फडणवीस सरकारचे कामातून उत्तर देण्याचा उद्देश असल्याची चर्चा आहे. सरकारच्या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन अशा विविध क्षेत्रात नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. दहावी नापास ते उच्च शिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी या करारानंतर मिळणार आहे .

Manganga

 

दरम्यान, १ लाखाहून अधिक रोजगारासाठी आज सामंजस्य करार करण्यार येणार आहे. यासाठी राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. राज्यपाल भगतसिंग कोशयारी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.