Latest Marathi News

BREAKING NEWS

“राज्यपाल पदासाठी शिंदे गटाकडे लायक असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे…”: ‘यांचा’ शिंदे गटांना टोला!

0 308

रत्नागिरी : राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

 

Jawale Jewellers

तटकरे म्हणाले, “केंद्रात दोन मंत्रीपद आणि दोन राज्यपाल पदांच्या शिंदे गटाचा बालहट्ट भाजपने पुरवावा. भारतीय जनता पार्टीला फार मोठा आधार शिंदे गटाकडून मिळाल्याचं भासवले जात आहे. केंद्रात दोन मंत्रीपदांची मागणी ही सुद्धा कमी आहे. वास्तविक अधिक असली पाहिजे. राज्यपाल पदासाठी शिंदे गटाकडे लायक असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यापेक्षा जास्तची मागणी शिंदे गटानी केली पाहिजे, असे वक्तव्य करत तटकरेंनी शिंदेंना टोला लगावला आहे.

Manganga

 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांची जरूर भेट घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांचं मत आणि मन समजावून घ्यावं. या साऱ्या प्रकरणात त्यांनी तटस्थ म्हणुन योग्य भूमिका घ्यावी, असेही तटकरे म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.