Latest Marathi News

BREAKING NEWS

“मी ठामपणे सांगतो, की भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य

0 135

मुंबई: मंगळवारी छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

 

Jawale Jewellers

भागवत म्हणाले की, मी ठामपणे सांगत आलो आहे की भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे लोक भारताला आपली मातृभूमी मानतात. विविधता असूनही एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहू इच्छितात ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदूच आहेत, या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.

Manganga

 

40 हजार वर्षे जुन्या ‘अखंड भारत’चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा DNA सारखाच आहे. आपल्या पूर्वजांनी शिकवलंय की प्रत्येकाने स्वतःच्या श्रद्धेवर आणि उपासनेच्या पद्धतीला धरुन रहावे. तसेच इतरांच्या श्रद्धा आणि उपासनेची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करू नये, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.