Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, बुधवार १६ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 728

मेष:-
कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. मानसिक चलबिचलता राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. सामाजिक भान राखून वागाल.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. घरात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

Manganga

 

मिथुन:-
कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील.जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. आनंदाची अनुभूति घ्याल. कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. मान-सन्मान प्राप्त होतील.

 

कर्क:-
नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. सामाजिक कामात सहभाग घ्याल. अतितिखट पदार्थ टाळा. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील.

 

सिंह:-
टीमवर्क यशस्वी रित्या पार पाडाल. आपली चांगली वर्तणूक लोकांना आकर्षित करेल. समस्यांचे निराकरण करता येईल. त्यातूनच समाधान लाभेल. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल.

 

कन्या:-
वातावरण अनुकूलतेसाठी प्रयत्न करावेत. लोकांशी बोलताना आपले विचार पक्के ठेवा. महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल. आपले मुद्दे ठामपणे मांडा. कोणत्याही वादात अडकू नका.

 

तूळ:-
आपली एखादी चुकही मान्य करावी लागेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या. कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. निष्काळजीपणा कमी करा. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीचे योग.

 

वृश्चिक:-
तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवून काम करावे. कामातील ताणाचे योग्य नियोजन करावे. आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकाल. अतिरिक्त भर घेऊ नका. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते.

 

धनू:-
आवश्यक गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल कामाचा उरक वाढवा. कामात आपले मत विचारात घेतले जाईल.. मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल.

 

मकर:-
कर्जाऊ व्यवहार टाळावेत. समोरील व्यक्ति आपला निर्णय मान्य करेल. जुन्या मित्रांशी संवाद साधता येईल. हुशारीने वागावे. प्रवास लाभदायक ठरतील.

 

कुंभ:-
बोलताना शब्द जपून वापरावेत. जोडीदाराच्या मदतीने अडकलेली कामे पुढे न्याल. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. दिवस मजेत जाईल. अनावश्यक खर्च टाळावेत.

 

मीन:-
लोकांवर अतिअवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्यावे. कोणत्याही गोष्टीत अति घाई करू नका. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल. काही कारणास्तव प्रवास करावा लागेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.