Latest Marathi News

BREAKING NEWS

‘येथे’ लवकरच १७०० कोटींचा प्रकल्प येणार: उद्योग मंत्री उदय सामंत!

0 156

मुंबई: वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होत आहे. अशातच आता, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील चंद्रपुरात होणाऱ्या मोठ्या प्रकल्पाची मोठी घोषणा केली आहे.

 

Jawale Jewellers

उदय सामंत म्हणाले, ‘महाराष्ट्राला गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कसं आणायचं याबाबत प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील कच्चा माल हा राजस्थानमध्ये जात आहे. राजस्थानमधून पक्का माल तयार होऊन तयार वस्तू पुन्हा राज्यात येत आहेत’.

Manganga

 

‘राजस्थानमधून येणारा पक्का माल आपण विकत घेतो. पण आपण तिथेच स्टील पार्क केला, तर महाराष्ट्राच्या अडचणी दूर होऊ शकतात. चंद्रपुरात एक हजार एकर जागा देऊन १७०० कोटींचा प्रकल्प लवकरच येणार आहे, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.