Latest Marathi News

BREAKING NEWS

‘हा’ प्रकल्प गुजरातला जाणार हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना अधिकाऱ्यांनी घरी जाऊन सांगितलं होत”

0 198

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. टाटा एअरबस प्रकल्प बाहेर जाणार हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती होते.

 

Jawale Jewellers

फडणवीस म्हणाले, टाटाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारावा असं वातावरण नाही, असं मी म्हटलं होत. आता त्यापलीकडे जाऊन सांगतो की, Tata एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार असं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घरी जाऊन टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Manganga

 

दरम्यान, उद्योग वाचवण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले आहेत. जो कांगावा केला जातो तो चुकीचा आहे. येत्या काळात महाराष्ट्रात मोठे उद्योग येतील. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.