Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबईत गोवरचा संसर्गाची वाढ; मुख्यमंत्र्यांनी पालिकेला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश!

0 94

मुंबई: मुंबईत गोवरचे वाढते रुग्ण हा चिंतेचा विषय असून कस्तुरबा रुग्णालयात 61 मुलांवर उपचार सुरु आहेत. कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतल्या आहे. ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे. तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Manganga

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.