Latest Marathi News

BREAKING NEWS

“…त्यामुळे मी बदला घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे”; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

0 413

 

Jawale Jewellers

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. यावर बोलताना शिवसेनेला (ठाकरे गट) उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले.

 

Manganga

तुमच्यासोबत २४ तास राहणारा व्यक्ती, तुमच्यासोबत सत्ता भोगणार व्यक्ती, तुमच्यासोबत निवडून आलेला व्यक्ती हा थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो त्यावेळी राजकारणात जीवंत राहून त्याला ते परत करावं लागतं. नाहीतर तुम्ही राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलंच राहिलं पाहिजे. पण तुमच्या चांगुलपणाचा कुणी फायदा घेत असेल तर बेईमानाला जागा दाखवलीच पाहिचे. त्यामुळे होय मी बदला घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे.

 

तसेच ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. माझी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक दुश्मनी झालेली नाही. आम्ही राजकीयदृष्ट्या दूर गेलो आता मनही जवळ येणार नाही. आता आम्ही यापुढे कधीही एकत्र येणार नाही, तशी परिस्थिती नाही. असा दावाही त्यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.