Latest Marathi News

BREAKING NEWS

“मला ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, पण….”: अमृता फडणवीस!

0 335

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या, बालदिनाच्या निमित्ताने त्यांनी नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या आहे. त्याच दरम्यान ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

 

Jawale Jewellers

नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात बोलत असतांना, ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही असे विधान अमृता फडणवीस यांनी नाशिकमध्ये केले आहे.

Manganga

 

दरम्यान, अमृता फडवणीस यांचे विधान नेहमीच स्पष्ट असल्याने अनेकदा त्या ट्रोलही होतात. इतकंच काय तर त्यांचे पती राजकारणात असल्याने त्यांच्या विधानावर आरोप प्रत्यारोप देखील होत असतात. नाशिकमध्ये केलेल हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.