पलूस : शिवसनेचे पलूस तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ३१ मुले दत्तक घेत त्यांच्या शालेय खर्च करण्याची जबाबदार उचलली असून त्यांच्या या निर्णयाने ३१ मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटणार असल्याने खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस सार्थकी झाला आहे.
प्रशांत लेंगरे यांची पलूस तालुका शिवसेना प्रमुखपदी निवड व वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम पलूस येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते म्हणाले, प्रशांत लेंगरे हा तालुकाप्रमुख म्हणून लायक आहे. प्रशांतच्या मागे शिवसेना खंबीर पाठीशी आहे. राजकारण करताना प्रत्येकाला त्रास हा होतच असतो तसा प्रशांतला पण दोन वर्ष त्रास झाला पण. परंतु येथून पुढे सर्वांनी जोमाने काम करा. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सध्या पलूस तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागलेली असून कार्यकर्त्यांनी जशी तशी ताकद असेल त्या ताकदीच्या आधारे ग्रामपंचायतीच्या लढवा. तालुक्यामध्ये किमान १० हजार सभासद नोंदणी कारण्याची उद्धिष्ट ठेवून गावोगावी शाखा, घर तिथं शिवसैनिक निर्माण करा आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून ताकदीने कामाला लागा असे आव्हान संजय विभूते यांनी केले.
तर प्रशांत लेंगरे म्हणाले. पक्षाचा आदेश असेल त्या प्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये ताकदीने काम करू, संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत करू. प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करू आणि गावोगावी शिवसेनेची सभासद नोंदणी असेल, शिवसेना शाखा असेल, प्रत्येक गावाच्या चौकात शिवसेनेचा बोर्ड लागला पाहिजे हे शिवसेनेचे उद्धिष्ट आहे आहे. या पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजनांना बरोबर घेऊन मी काम करीन आणि येणाऱ्या काळामध्ये कोणतीही निवडणूक असो त्यात शिवसेना हिरिरीने भाग घेऊन त्या ठिकाणी जिंकल्याशिवाय शिवसेना शांत व स्वस्त बसणार नाही असा संकल्प व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त प्रशांत लेंगरे यांनी ३१ शालेय मुलांना दत्तक घेतले व त्या मुलांना स्कूल बॅग, वह्या, युनिफॉर्म, गहू, तांदूळ वाटप केले. तसेच १३/१२/२०२० ला पलूस तालुक्यात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर दहा हजार फिक्स डिपॉजिट करण्याची जबाबदारी घेतली. यावेळी 500 मास्क वाटप करण्यात आले.
आटपाडी चे युवानेते विनायक मासाळ, पलूस बँकेचे चेअरमन वैभवदादा पुदाले, सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब बापु पवार,सांगली शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ लेंगरे, भालचंद्र कांबळे, दत्ता हेगडे,प्रकाशआप्पा पाटील रिपाई चे विशाल तिरमारे, शितल मोरे, राजू शेठ जानकर N.P खरजे सर सांडगेवाडी चे शरदकाका शिंदे, यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास प्रशांत लेंगरे यांचे सर्व तरुण सहकारी मित्र व कार्यकर्ते भाऊ श्रीकांत, रोहित, व मित्र परिवार शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



