Latest Marathi News

BREAKING NEWS

अधिकाऱ्यांच्या बैठकी तर सोडाच, अजित पवारांनी ‘यावर’ बोलू नये: चंद्रशेखर बावनकुळे!

0 166

 

Jawale Jewellers

मुंबईः राज्यातील पोलिस यंत्रणेवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यादरम्यान होणाऱ्या बैठकांवरही अजित पवार यांनी टीका केली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Manganga

ते म्हणाले, ‘अजित पवार हे अस्वस्थतेतून बोलत आहेत. विरोधी पक्षनेत्याचा अधिकार म्हणून सरकारवर आरोप करण्याची केविलवाणी धडपड आहे, महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री तर काचेच्या भिंतीत होते. त्यांना काही माहितीच नव्हतं. ज्या सरकारच्या बैठका होत नव्हत्या, फेसबुक लाईव्ह होतं, कॅबिनेटच्या बैठकाही फेसबुकवर होत होत्या…अधिकाऱ्यांच्या बैठकी तर सोडाच… त्यामुळे त्या लोकांनी बैठकांवर बोलू नये… असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.