Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ तारखेला मुख्यमंत्री आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार!

0 371

मुंबई: राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, २१ नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Jawale Jewellers

दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत असल्याचे बोलले जात आहे. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Manganga

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा एक दिवसीय दौरा आहे. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.