Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरेंचा अचानक दौरा ठरल्याने चर्चेला उधान

0 88

मुंबई: गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात पुन्हा निवडणुका लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही निवडणुकांसंर्भात एक वक्तव्य केले आहे. यावरुन राज्यात जानेवारी नंतर निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Jawale Jewellers

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अचानक पुणे दौऱ्यावर गेले आहेत. राज ठाकरे यांचा पुणे दौरा नाही. त्यामुळे या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. हा दौरा नेमका कोणत्या कारणासाठी आहे, याची अजुनही माहिती समोर आलेली नाही. काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाली आहे.

Manganga

काल राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि आज अचानक ते पुणे दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू आहेत. काही महिन्यात महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमिवर हा दौरा असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.