Latest Marathi News

BREAKING NEWS

टोल टॅक्ससंदर्भ नियमात ‘हा’ मोठा बदल: नितीन गडकरी!

0 608

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्ससंदर्भात नियमात बदल झाल्याची माहिती दिली आहे. टोल टॅक्स विषयी कायद्याचा प्रस्ताव तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

 

Jawale Jewellers

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, सध्या देशात टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. पण रस्ते विकासासाठी निधीची मोठी आवश्यकता असते. त्यासाठी टोल टॅक्स तर बंद होणार नाही. पण वसूल करण्याची पद्धत बदलेल.

Manganga

 

आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येईल. टोल टॅक्स वसूलीसाठी तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी काही पद्धत बदलण्यात येणार आहे.

 

या सर्वासाठी कायद्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. टोल टॅक्स न भरणाऱ्या वाहनधारकांना शिक्षेची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार, टोल टॅक्स थेट तुमच्या खात्यातून कापल्या जाणार आहे.

 

दरम्यान, आता नवीन नियमानुसार, तुम्ही जेवढे अंतर कापाल तेवढाच टोल भरावा लागणार आहे. पूर्वी 10 किलोमीटर अंतर कापले तरी 75 किलोमीटरपर्यंताचे शुल्क भरावे लागत होते. आता यामध्ये बदल करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.