Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, मंगळवार १५ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 719

मेष:-
प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
लहान प्रवास संभवतात. यात्रा सुखकर होईल. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका.

Manganga

 

मिथुन:-
तज्ञ व्यक्तींची भेट होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. शेजार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल.

 

कर्क:-
अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. वाणीत माधुर्य जपावे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका.

 

सिंह:-
आपले छंद जोपासावेत. कामातील समस्या दूर कराव्या लागतील. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते.

 

कन्या:-
संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल. विरोधकांच्या करवायला कमी होतील. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान वाढेल.

 

तूळ:-
धनलाभाचे योग संभवतात. विरोधक पराभूत होतील. नवीन काम सुरू करू शकता. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

 

वृश्चिक:-
जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. उगाच चिडचिड करू नये. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल.

 

धनू:-
स्पर्धेत यश मिळेल. मौल्यवान वस्तूंचे जतन करा. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

 

मकर:-
कोणावरही अति विश्वास दाखवू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. आरोग्याची काळजी घ्यावी. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.

 

कुंभ:-
देवावरील श्रद्धा वाढेल. मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. थोडीशी धावपळ करावी लागेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील.

 

मीन:-
मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. प्रवास लाभदायक ठरतील. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.