Latest Marathi News

BREAKING NEWS

“…. त्यापेक्षा राजकारणात नकोच”: जितेंद्र आव्हाड यांचे भावूक होत मोठे वक्तव्य!

0 231

ठाणे : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड भावूक होत जयंत पाटलांसमवेत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

 

Jawale Jewellers

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘माझा जन्म 354 आणि 376 साठी झालेला नाही. माझ्यावर कोणताही आरोप केला असता तर चाललं असत पण 354 मला मान्य नाही. मी आयुष्यात असं काही करू शकत नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला जात असून हा कटाचा भाग असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

Manganga

 

 

354 चा गुन्हा दाखल झाल्यावर माझ्या मुलीला अनेक जण प्रश्न विचारत आहेत. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये. ही कारवाई माझ्या मनाला लागली आहे. समाजात माझी बदनामी करण्यसाठी हे षडयंत्र आहे, माझ्यावर खुनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असतं. माझ्याविरोधात ओढूनताणून गुन्हा नोंदवला जात आहे. विनयभंगाचा आरोप मान्य नाही, त्यापेक्षा राजकारणात नकोच असंही आव्हाड यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.