Latest Marathi News

BREAKING NEWS

“आव्हाड राजीनामा घेऊन शरद पवार यांच्याकडे निघाले होते, मात्र तो राजीनामा मी…”:जयंत पाटील

0 356

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आव्हाडांच्या भूमिकेनंतर त्यांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी बोलताना जयंत पाटलांना काही प्रश्न उपस्थित केले.

 

Jawale Jewellers

जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री गाडीत असताना, पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त असताना विनयभंग कसा होईल? मनात राग ठेऊन सरकारने ही कृती केली. त्या महिलेने मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. त्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. यावरुन मुख्यमंत्री विरुद्ध जितेंद्र आव्हाड असे चित्र निर्माण होत आहे, सरकार आणि पोलिसांनी केलेल्या कृतीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आव्हाड राजीनामा घेऊन शरद पवार यांच्याकडे निघाले होते, मात्र तो राजीनामा मी माझ्याकडे घेतला आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झाली आहे, असे जयंत पाटील यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.