Latest Marathi News

BREAKING NEWS

म्हसवड : टीव्ही का बंद केला म्हणून, पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून

0 1,063

म्हसवड : किसन नारायण सावंत (वय ५०, रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) यास पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना माण तालुक्यातील दिवड येथे घडली.

Jawale Jewellers

याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिवड, ता. माण येथे किसन नारायण सावंत आपल्या कुटुंबासह राहत होते. १ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास किसन सावंत हे बाहेरून घरी आले. मुलगा व बायको मोबाइल पाहत होते ; पण घरातील टीव्ही तसाच चालू होता. तो कोणीही पाहत नाही, म्हटल्यावर त्यांनी तो बंद केला. टीव्ही का बंद केला म्हणून पत्नी उषा किसन सावंत, मोठा मुलगा आदित्य किसन सावंत या दोघांनी आपापसात संगनमत करून घरातील कळकाची दांडकी घेऊन त्यांच्या डोक्यात मारले. संपूर्ण अंगावर तसेच त्यांच्या छातीवर, पोटावर लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले होते.

Manganga

त्यानंतर त्यांना नातेवाईकांनी प्रथम पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असतानाच शनिवारी (दि.१२) त्यांचा मृत्यू झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.