Latest Marathi News

BREAKING NEWS

“….त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असू शकतो”: सुप्रिया सुळे!

0 263

पिंपरी चिंचवड : जितेंद्र आव्हाड याचं विधानसभेतील काम चांगलं आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, पक्ष त्यांच्या नेहमी पाठीशी आहे, असे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले.

 

Jawale Jewellers

तसेच त्या पुढे म्हणाल्या, मुख्यंत्र्यांसमोर आणि बंदोबस्तात असलेल्या इतर पोलिसांसमोर जितेंद्र आव्हाड यांनी त्या महिलेला इथे गर्दीत कशाला आली, असं म्हणत हाताने बाजूला सारलं. हा काही विनयभंग आहे का? आव्हाड यांच्या विरोधात खोटा आणि चुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

Manganga

 

दरम्यान, राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असू शकतो. किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.