Latest Marathi News

BREAKING NEWS

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व कौशल्य विकासासाठी भरारी प्रकल्प

0 207

सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये आता ग्रामपंचायतीच्या पैशांतून शिक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यासाठीचा वेतनखर्च १५ व्या वित्त आयोगातून केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये शैक्षणिक विकासाचाही अंतर्भाव असून, त्यामुळे ग्रामपंचायतींनीही त्याला विरोध केलेला नाही.

 

Jawale Jewellers

वित्त आयोगातून शाळांची वीजबिले, पथदिव्यांची बिले यासह अनेक प्रकारचे खर्च केले जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष विकासकामांसाठी निधीचा तुटवडा निर्माण होत आहे. वित्त आयोगाचा मूळ उद्देशच बाजूला पडत आहे. यातच आता जिल्हा परिषदेने शिक्षक नियुक्तीचे आदेश काढले आहेत. मानधन तत्त्वावर ते काम करतील.

Manganga

राबविला जात असल्याचे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. त्यातून पटसंख्याही वाढेल आणि विद्यार्थी शिक्षणात रस घेऊ लागतील, असाही दावा करण्यात आला आहे. याची जबाबदारी क्षितिज संस्थेवर सोपविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक उपक्रमशील आणि सक्षम आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा शिष्यवृत्ती, नृत्य, नाट्य, क्रीडा, विज्ञान प्रकल्प आदी क्षेत्रात राज्य पातळीवर पताका गाजवत आहेत. तरुण पिढीतील शिक्षक उपक्रमशील आहेत. या स्थितीत नव्याने मानधनावर शिक्षक घेऊन खर्चात वाढ कशासाठी, असा प्रश्न ग्रामपंचायती उपस्थित करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.