Latest Marathi News

BREAKING NEWS

“आव्हाडांच्याविरोधात ते कलम लावण्याची गरज नव्हती. त्यांना….”: अजित पवार!

0 275

पुणे:राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाडांवरील आरोपांवरून संताप व्यक्त केला आहे.

 

Jawale Jewellers

पवार म्हणाले, “आव्हाडांच्याविरोधात ते कलम लावण्याची गरज नव्हती. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे. चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात हे लक्षात घ्या, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.

Manganga

आमदार कोणत्या पक्षाचा आहे हा विचार न करता चूक झाली असेल, कायदा हातात घेतला असेल, नियमाप्रमाणे वागले नसेल तर कारवाई करा. दुमत नाही, असं ते म्हणाले.

पण कारण नसताना लोकप्रतिनिधीला अपमानित करण्याचं काम करत असेल तर जनतेनेही जागृतपणे पाहिलं पाहिजे. सरकारनेही चुकलं हे सांगितलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला तो मागे घेतला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.