Latest Marathi News

BREAKING NEWS

‘मी भाजपची जरी असले, तरी..…’: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या रीदा राशीद यांचे मोठे वक्तव्य!

0 555

 

Jawale Jewellers

मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या रीदा राशीद यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार का दिली, हे स्पष्ट केले.

 

Manganga

रीदा राशीद म्हणाल्या, ‘मी भाजपची जरी असले, तरी भाजप म्हणून मला कमी लोकं ओळखतात, माझी खरी ओळख एक सामाजिक संस्था चालवणारी महिली, अशी आहे’, असे रीदा राशीद यांनी यावेळी म्हटले.

 

तसेच, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरुनही राशीद यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर त्यांनी भाष्य करणे टाळले. योग्य वेळी व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडीओवर बोलेन, असे त्या म्हणाल्या.

 

दरम्यान, भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.