Latest Marathi News

BREAKING NEWS

व्हिडीओ: झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला पाच फूटांचा जिवंत साप, अन….!

0 655

नवी दिल्ली: झोपेत असताना अनेक व्यक्ती घोरतात तसेच काहींचे तोंड उघडे राहते. दरम्यान सोशल मिडिया वर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या तोंडातून चक्क साप बाहेर काढण्यात आला आहे.

 

Jawale Jewellers

माहिती नुसार सदर महिला रशियातील मॉस्कोच्या दागिस्तानमध्ये राहणारी आहे. ती झोपली असताना हा प्रकार घडला. झोपेत ती घोरत होती. त्यामुळे साप तिच्या जवळ आला. त्यानंतर सापाने थेट महिलेच्या तोंडात प्रवेश केला. साप तोंडात जात असताना महिलेला जाग आली. ती खूप घाबरली आणि आरडाओरडा करू लागली. त्यामुळे लगेचच कुटुंबीय तिथे पोहचले. त्यांना ही घटना समजल्यावर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले. तोवर साप महिलेच्या पोटात गेला होता. त्यामुळे तिचे पोट खूप दुखत होते. डॉक्टरांनी तिच्या पोटाचा एस्करे घेतल्यावर पोटात साप असल्याचे पक्के झाले.

Manganga

पहा व्हिडीओ:

दरम्यान, डॉक्टरांनी एका ट्यूबच्या सहाय्याने साप बाहेर काढला. हा साप तब्बल ५ फूट लांबीचा असून सापाला कोणताही त्रास झाला नसून तो जिवंत आहे. तसेच महिला देखील सुखरूप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.