Latest Marathi News

BREAKING NEWS

“जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा ही महाराष्ट्राची शोकांतिका”!

0 355

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ मविआच्या महिला खासदार या मैदानात आल्या आहेत. मविआचं शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला आले होते. यावेळी यावेळी आव्हाड यांच्याबाबत विचारलं असता त्यांनी आव्हाडांचं समर्थन केलं आहे.

 

Jawale Jewellers

फौजिया खान म्हणाल्या, विनयभंगाचा प्रश्नच येत नाही. तिथे कुठे विनयभंग झाला. आव्हाडांनी राजीनामा देण्याची घोषणा करणं ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. लोकप्रतिनीधींवर या प्रकारचे हल्ले सरकारकडून होतायत याचा आम्ही निषेध करतो असेही फौजिया खान म्हणाल्या आहेत.

Manganga

 

दरम्यान, या शिष्टमंडळात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार जया बच्चन तसेच मविआच्या इतर महिला आमदार आणि महिला खासदार यांचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.