Latest Marathi News

BREAKING NEWS

महिलांचा अपमानाबाबत राज्यपालांनी लक्ष घालावं व ‘या’ नेत्यांची हकालपट्टी करावी!

0 317

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडूनच महिलांवर अश्लील टिप्पणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचला.

 

Jawale Jewellers

समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान, विद्या चव्हाण, आदिती तटकरे, आदिती नलावडे, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, ऋतुजा लटके, आमदार मनिषा कायंदे आदी महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. त्यानंतर या महिला नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला.

Manganga

 

दरम्यान, या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालावं आणि अशा नेत्यांना अटकाव आणावा, अशी मागणी या महिला आमदार, खासदारांनी केली आहे. तसेच, भीमा कोरेगावात इतरांवर गुन्हे दाखल केले. पण संभाजी भिडेंविरोधात गुन्हे दाखल झाले नाही. एकबोटेंविरोधात गुन्हे दाखल केले नाही. भाजपची मनमानी सुरू आहे. त्यामुळे शिंदेंनी हे खातं स्वत:कडे घ्यावं, असे विद्या चव्हाण म्हणाल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.