Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, सोमवार १४ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 757

मेष:-
आपले संपर्क क्षेत्र वाढेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. एकमेकातील एकोपा वाढीस लागेल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
मात्र काही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. सहकारी वर्गाशी सलोखा वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

Manganga

 

मिथुन:-
मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. करमणुकीत अधिक काळ रमाल. गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील.

 

कर्क:-
काही गोष्टी आपल्याला विस्मित करतील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल.

 

सिंह:-
हातून एखादे सत्कार्य घडेल. नातलगांशी जवळीक वाढेल. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. प्रवासाची हौस भागवता येईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल.

 

कन्या:-
मौल्यवान वस्तु खरेदी कराल. आपली इतरांवर छाप पडेल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. आर्थिक बाजू सुधारेल.

 

तूळ:-
आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

 

वृश्चिक:-
मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. काही बाबीत पिछेहाट झाल्यासारखे वाटू शकते. सूर्याची उपासना करावी. आपली जिद्द वी चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल.

 

धनू:-
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. हातातील कामात यश येईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलावे. मनोकामना पूर्ण होईल. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील.

 

मकर:-
कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत. आर्थिक बाजू सुधारेल. जुन्या गोष्टी आठवून खट्टू होऊ नका. मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे.

 

कुंभ:-
शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका. ऐषारामाच्या साधनांची खरेदी कराल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल.

 

मीन:-
जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल. हातातील कामात यश येईल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. चांगला धनलाभ संभवतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.