Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, रविवार १३ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 682

मेष:-
मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. पूर्ण खात्री केल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. जोडीदाराचे सान्निध्य व सहयोग लाभेल.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. तब्येतीची तक्रार कमी होईल. मुलांकडून दिलासा मिळू शकेल. अचानक धनलाभ संभवतो. दिवस शांततेत व्यतीत होईल.

Manganga

 

मिथुन:-
मुलांच्या यशाने खुश व्हाल. नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल. आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवा.

 

कर्क:-
आपल्याच विचारात गर्क राहाल. व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा. प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल. जोडीदारासमोर आपले विचार स्पष्टपणे मांडा. दिवस मध्यम फलदायी असेल.

 

सिंह:-
विरोधक पराभूत होतील. कामाचा व्याप वाढता राहील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. सामाजिक संबंध जपले जातील. दिवसभरात काहीनाकाही लाभ मिळतील.

 

कन्या:-
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. काही तडजोडी कराव्या लागतील. कामात सहकारी मदत करतील. समाधान मिळवू शकाल.

 

तूळ:-
स्व‍च्छंदीपणे सर्व गोष्टींकडे पहाल. आपल्याच मर्जीत दिवस घालवाल. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील.

 

वृश्चिक:-
लपवाछपवीचा मार्ग धरू नका. काही कामे अडकून राहू शकतात. अपेक्षित उत्तराने खुश व्हाल. कामाच्या ताणाने निराश होऊ नका. आपली चिकाटी कायम ठेवा.

 

धनू:-
आवडत्या वस्तु खरेदी करता येतील. घरातील व्यक्तींचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. जवळचा प्रवास कराल. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक बाबी शांतपणे हाताळा.

 

मकर:-
भावंडांशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. समाजात मान वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील.

 

कुंभ:-
दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत. दिवस आपल्या मनाजोगा घालवाल. आपले मत विचारात घेतले जाईल. कामातील प्रयत्न फळाला येतील. सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल.

 

मीन:-
मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल. उतावीळपणा करून चालणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी. फार विचार करत बसू नका. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.