Latest Marathi News

BREAKING NEWS

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापनेची मागणी मान्य: तर ‘या’ खात्याचे मंत्रिपद मिळाल्यास अधिक आनंद हाेईल: बच्चू कडू!

0 239

 

Jawale Jewellers

मुंबई: प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांची दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे ही मागणी अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आज अमरावतीच्या संत गाडगेबाबा मंदिरात आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत व ढोल ताशांचा गजर करत जल्लोष केला.

 

Manganga

यावेळी बच्चू कडू म्हणाले शिंदे -फडणवीस सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय आहे. दिव्यांगांचा एक स्वप्न होतं ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. यासाठी मी अनेक आंदोलने केली. त्यासाठी गुन्हे झेलले. त्यामुळे दिव्यांग मंत्रालयाचा आनंद आमच्यासाठी मोठा आहे असेही बच्चू कडू यांनी नमूद केले.

 

दरम्यान, यावेळी दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर अधिक आनंद होईल अशी भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.