मुंबई: वेदांचा फॉक्सकॉन, टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत होती. वेदांता-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत गेले असतानाच आता ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याच्या हातातून निसटला आहे. यावरून विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे.अशातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत देखील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘महाराष्ट्र सरकारचे आणखी एक अपयश. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे वेदांत फॉक्सकॉन,बल्क ड्रग्ज पार्क, एअरबस टाटा हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेल्यानंतर ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर…’ अशा शब्दात ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, ऊर्जा उपकरण निर्मिती या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 400 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे. हा प्रकल्प मिळण्यासाठी आठ राज्यांमध्ये स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत मध्य प्रदेश एमआयडीसीने बाजी मारली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या आठ राज्यांमध्ये स्पर्धेत होते. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र एमआयडीसी ने केंद्र सरकारला पत्र पाठवलं होतं. मात्र, राज्य सरकारला ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प मिळविण्यासाठी यश आलं नाही. यावरून सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे.