Latest Marathi News

BREAKING NEWS

“कुठलाही प्रकल्प तीन महिन्यात येतो आणि जातो असं कधी घडत नाही”: मुख्यमंत्री शिंदे!

0 213

नागपूर: राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे भाष्य केलं आहे.तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. नागपुरात विमानतळावर उतरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

Jawale Jewellers

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुठलाही प्रकल्प तीन महिन्यात येतो आणि जातो असं कधी घडत नाही. ही काही जादूची कांडी नसते की, फिरवलं नि इकडं आला नि तिकडं गेला. आरोप करायचं तर कुणीही आरोप करू शकतो. असा टोलाही त्यांनी माहाविकास आघाडीला लगावला. आमचं सरकार उद्योगांचा चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणार सरकार आहे, असंही ते म्हणाले.

Manganga

 

दरम्यान, 100 कोटी रुपये खर्च करून गोसेखुर्दचं जलपर्यटन विकसित केले जाणार आहे. जलपर्यटन आणि जलक्रीडेचे काही प्रकार येथे सुरू होणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजचा हा दौरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.