Latest Marathi News

BREAKING NEWS

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तरुणाने केले अत्याचार!

0 357

बीड: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. ज्या तरुणाने मुलीवर अत्याचार केले होते, तो तरुण आपल्या परिवारासह मुलीच्या घरी तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी आला होता. मात्र, त्यांचे लग्न मोडले होते.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीला लग्नासाठी स्थळ आले होते. मुलीची पसंतीही झाली, पण हुंडा देण्या-घेण्यावरून हे लग्न मोडले. मात्र, लग्न मोडल्यावरही तरुणाने मुलीचा पिच्छा सोडला नाही. ही अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी बीडमध्ये एका शासकीय वसतीगृहात राहते. ती 16 वर्षांची आहे. आरोपी तरुणाने या अल्पवयीन मुलीला वारंवार लग्नाचे आमिष दाखवले. एके दिवशी हा तरुण या मुलीच्या वसतिगृहाजवळ आला आणि तिला फूस लावत आपल्या दुचाकीवरून बाहेर नेले. यावेळी त्याने मुलीला चक्क लॉजवर नेले तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लॉजवर दोनवेळा त्याने अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म केले. तिसऱ्यांदा त्याने या अल्पवयीन मुलीला गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे एका शेतात नेले आणि बळजबरी केली. मुलीने आधी लग्न करू असे सांगितल्यावर त्याने तिला शिवीगाळ करत तिला एकटीला सोडून दुचाकीवरून पलायन केले.

Manganga

 

दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सचिन सुभाष राठोड रा. टाकरवण, ता. माजलगाव याच्यावर बीड शहरातील पेठ बीड ठाण्यात, बलात्कार, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.