Latest Marathi News

BREAKING NEWS

बीड: कुत्रा भुंकला म्हणून एकाने बंदुकीने कुत्र्यावर….. !

0 233

बीड: बीडच्या परळी-धर्मापुरी मार्गावर असलेल्या एका धाब्यावर कुत्रा भुंकला म्हणून एकाने चक्क त्याच्या जवळील बंदुकीतून कुत्र्यावर गोळीबार केला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेला कुत्रा जागीच ठार झाला आहे. ही घटना घडली आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, परळी-धर्मापुरी मार्गावर विकास बनसोडे यांचे हॉटेल आहे. या हॉटेलवर विकास बनसोडे यांचा एक कुत्रा देखील आहे. मात्र हा कुत्रा भुंकला म्हणून हॉटेलवर आलेल्या रामराज घोळवे, रा. परळी याने कुत्रा भुंकत असल्याच्या कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारले.

Manganga

 

दरम्यान, याप्रकरणी हॉटेल चालक विकास बनसोडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन कलम 428,429 भादवी, कलम 25(3) भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.