Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगलीः “जितेंद्र आव्हाड यांची अटक म्हणजे राज्य सरकारचे “हर हर महादेव” चित्रपटाला समर्थन”

0 270

सांगलीः ‘हर हर महादेव’ चित्रपट शो बंद करण्याच्या मागणीवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप करुन त्यांना आज अटक केली गेली. या प्रकरणी राष्ट्रवाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.

 

Jawale Jewellers

आमदार जयंत पाटील म्हणाले की, हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित करुन राज्य सरकार चित्रपटाला पाठीशी घालतो आहे असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता स्वस्त बसणार नाही, इतिहासासाची मोडतोड करणारा “हर हर महादेव” या चित्रपटाचे राज्य सरकारकडूनचं समर्थन केलं जातं आहे, राज्य सरकारने हा चित्रपट दाखवू देऊ नये, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवला जात असले तर राज्यसरकारने ते थांबवणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Manganga

 

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक केली गेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आव्हाडांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही जयंत पाटील यांनी भाष्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.