“पत्रकारांना बोलावू नका, सुपारी घेऊन आम्हाला प्रश्न विचारायला येतात..”: भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ!
मुंबई: भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून पत्रकाराने चित्रा वाघ यांना माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरून प्रश्न विचारताच त्या चांगल्याच संतापल्या.
यावेळी, चित्रा वाघ म्हणाल्या, मागच्या सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपदावरून काढायला किती वेळ लागला. तुम्हाला माहीत आहे का, मी वर्षभरात काय काय सहन करावं लागलं ? मी एका मुलीसाठी लढत होती. माझी जितकी ताकद आहे, तितकी ताकद लावणार आहे. हे तुम्हाला सांगत आहे. मी कालही लढले, आजही लढले’.
‘आपण ज्या प्रकारे आरोप करत आहेत, त्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही कोर्ट आहात ? तुम्ही न्याय देणार आहात का ? मी स्वत: कोर्टात गेली आहे. माझा लढा सुरू आहे, अशाही चित्रा वाघ म्हणाल्या. ‘या असल्या पत्रकारांना बोलावू नका, सुपारी घेऊन आम्हाला प्रश्न विचारायला येतात, अशा शब्दात चित्रा वाघ या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर संतापल्या.