जालना : जालन्यात आमदार कैलास गोरंटयाल यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत गोरंटयाल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर घणाघाती टीका केली.
सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. पण माफी मागितली नाही; असे सांगत राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ एकदा होऊन जाऊ द्या मग दाखवतो. त्यांची मस्ती जिरवतो अशी धमकीही गोरंट्याल यांनी सत्तार यांना दिली.
तसेच ते पुढे म्हणाले, अब्दुल सत्तार मोठे झाले पण त्याची बुद्धी मोठी झाली नाही. शिंदे गटाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मतिमंद मुलाच्या शिक्षकांकडून प्रशिक्षण द्यावे, सत्तार हा मूर्ख मंत्री आहे असा पुनरुच्चारही गोरंट्याल यांनी केलाय.