मुंबई: आव्हाडांना अटक केल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मॉलमध्ये जो प्रकार घडला, तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कायदेशीर कारवाई आहे, यावर बोलणं योग्य नाही. कोणी मारहाण केली, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे वर्तन करू नये. तरूणाला मारहाण झाल्यानंतर पोलिसांना जे योग्य वाटले, त्यानुसार गुन्हा दाखल झाला. कायदा आणि सुव्यवस्था कुणीही बिघडवू नये. पोलिसांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान, हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जिंतेद्र आव्हाड यांच्या नेतृत्वातही ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कार्यकर्त्यांकडून चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आज जितेंद्र आव्हाड यांना अटक केली.