मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं निधन झाले आहे. जीममध्ये वर्कआउट करताना ४६ व्या वर्षी सिद्धांतचं निधन झालं. अलीकडेच आनंद सूर्यवंशी हे नाव बदलून सिद्धांत सूर्यवंशी केलं होते.
माहितीनुसार, सिद्धांतला शुक्रवारी सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतरही तो जीममध्ये गेला होता. जीममध्ये वर्कआउट करताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. सिद्धांत याला त्याचा ट्रेनर रुग्णालयात तातडीने घेऊन गेला. तिथे त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, जय भानुशाली याने सिद्धांत वीरचे फोटो शेअर करत हे दुःखद वृत्त दिले आहे.