मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भास्कर जाधव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव म्हणाले, ‘ भाजपचे नेते एका बाजूला साधनशूचितेचा आणि समंजसपणाचा आव आणतात. आपण कटूता संपवली पाहिजे. द्वेष संपवला पाहिजे म्हणतात. भाजपच्या प्रांताध्यक्षांनी शरद पवार यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं असेल तर भाजपचा फॉरमुला हाच आहे. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, एका बाजूला द्वेष संपवूया असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला द्वेषमूलक वक्तव्य करायची, ही भाजपची जुनी खोडच आहे, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले आहे.