मुंबई:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील ठाण्याच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर वेरिशेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या गटात सामील करून घेतले आहे. रागिणी शेट्टी आधी शिंदे गटात होत्या. मात्र, आता त्यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
माहितीनुसार रागिणी भास्कर या शिवसेनेच्या ठाण्यातील पहिल्या नगरसेविका होत्या. आज त्यांनी मातोत्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधलं आहे. त्यांच्यासह भास्कर वेरिशेट्टी साहिल वेरिशेट्टी आदींनीही शिवबंधन बांधून शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचे वचन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले .
दरम्यान, याप्रसंगी शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख , ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर आणि असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते. तसेच, बालेकिल्ल्यातीलच शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे